Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फिदायीन अतिरेकी म्हणजे काय?

Webdunia
या युवकांना इस्लामच्या मार्गाने जाण्याची, काफिरांविरोधात जिहाद पुकारण्याची आणि अमेरिकेतील 9/11 घडविणार्‍या त्या १९ जणांची प्रेरणा त्यांना दिली जाते. कोवळ्या वयातील अल्पशिक्षित युवक या प्रचाराला भुलून दहशतवाद्याच्या मार्गाकडे वळतात आणि फिदायीन बनतात.      
मुंबईवरील हल्ल्याच्या निमित्ताने फिदायीन म्हणजे आत्मघातकी हल्लेखोरांची ओळख आपल्याला झाली आहे. वास्तविक भारताला आत्मघाती हल्ले नवीन नाहीत. पण असे हल्ले काश्मीरमध्ये जास्त होत होते. मुंबईच्या निमित्ताने ते प्रथमच सर्वसामान्यांसमोर आले आहेत. या फिदायीन हल्लेखोरांना एक लक्ष्य दिले जाते. ते पूर्ण करण्यासाठी प्रसंगी जीव गेला तरी बेहत्तर अशी त्यांची मनोवस्था असते. तशा सर्वच दहशतवादी संघटनांत असे आत्मघाती हल्लेखोर असतात. एलटीटीईने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या अशाच हल्लेखोरामार्फत केली होती. इस्लामी दहशतवादी 'जिहाद'च्या नावावर त्यांना अशा हल्ल्यांसाठी तयार करतात. हे फिदायीन हल्लोखोरही आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्यजनांची कत्तल करतात.

फिदायीन हल्ल्यांच्या प्रचारासाठी आता अत्याधुनिक प्रसारमाध्यमे सहाय्यभूत ठरत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातूनही फिदायीन भरती केली जाते. इस्लामिक जिहादी गट आपल्या कारवायांसाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचे अमेरिकेतील गुप्तचर संस्थेच्या तपासात आढळले आहे. आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून या संघटना युवकांना आकर्षित करत आहेत. त्यांना 'हिरो' असे संबोधून हल्ल्यात मृत झाल्यानंतर 'शहीद' म्हणवले जाल असे त्यांच्या मनावर बिंबवले जात आहे.

या युवकांना इस्लामच्या मार्गाने जाण्याची, काफिरांविरोधात जिहाद पुकारण्याची आणि अमेरिकेतील 9/11 घडविणार्‍या त्या १९ जणांची प्रेरणा त्यांना दिली जाते. कोवळ्या वयातील अल्पशिक्षित युवक या प्रचाराला भुलून दहशतवाद्याच्या मार्गाकडे वळतात आणि फिदायीन हल्लेखोर होतात. त्यांना या 'शहिद' होण्याचेही आकर्षण दाखवले जाते. या हल्लेखोरांना मृत्यूनंतर 'शहिद' असे संबोधले जाते.

फिदायीन म्हणून दाखल होणारी मुले फक्त अल्पशिक्षित असतात असे नाही. अनेक सुशिक्षित मुलेही हल्ली फिदायीन बनू लागली आहेत. इंजिनियर, डॉक्टरही या अपप्रचाराला बळी पडतात. इतकेच नव्हे तर अगदी कोवळी मुलेही फिदायीन बनली आहेत. २००६ मध्ये इराकमध्ये फालुजा येथील लढाईत तेरा वर्षाचा एक मुलगाही मारला गेला. त्याच्या आई-वडिलांना असे वाटत होते, की त्यांचा मुलगा कुंग फू स्पर्धेत भाग घेण्यासाठी जॉर्डनला गेला आहे.

फियादीन बनण्याची कारणे काय?
फियादिन अतिरेकी ओसामा बिन लादेनला आपला आदर्श मानतात. फिदायीन तयार करण्यासाठी धर्माचा पुरेपूर वापर केला जातो. कोवळ्या वयातील मुलांना त्याकडे वळविले जाते. शहिद झाल्यानंतर जन्नतमध्ये हुरो (सुंदर पर्‍या) मिळतील. सर्व ऐशआराम मिळतील, असे सांगितले जाते.

अतिरेकी संघटना गरीब देशातील युवकांच्या परिस्थितीचाही फायदा उठवतात. गरीबीमुळेही हे लोक अतिरेकी बनतात. त्यांना मासिक वेतन दिले जाते. शहिद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला मोठी रक्कम दिली जाईल, असे आश्वासन दिले जाते.

फिदायीन अतिरेक्यांचे ट्रेनिंग-
या मुलांना फिदायीन अतिरेकी बनण्याचे ट्रेनिंग दिले जाते. हे ट्रेनिंग नेहमीच्या अतिरेक्यांपेक्षा अगदी वेगळे असते. त्यासाठी मुळात मानसिक तयारी आहे की नाही याची चाचपणी केली जाते. फिदायीन होण्यासाठी त्याला प्रथम मानसिकदृष्ट्या तयार केले जाते. आपल्या धर्मावर कसा अन्याय होतो आहे हे त्याच्या मनावर वारंवार ठसवले जाते. त्यामुळे रक्ताचा बदला केवळ रक्तानेच घेता येईल, असे बिंबवले जाते. त्यानंतर मग त्याला शस्त्रास्त्रांचे ट्रेनिंग दिले जाते. त्याला गनिमी काव्याचे आणि समोरासमोर लढाईचे ट्रेनिंगही दिले जाते.

कमीत कमी पाणी व जेवणाशिवाय राहण्याची त्यांची तयारी केली जाते. त्यांच्या डोक्यात परधर्माविषयी एवढे विष पेरले जाते की त्यापलीकडे त्यांना काही दिसत नाही. सूडाची एकमेव भावना त्यांच्या मनावर स्वार असते. हे अतिरेकी आता खतरनाक बनलेले असतात.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

SA20: पहिल्याच सामन्यात 28 वर्षीय खेळाडूचा मलिंगा-बुमराहच्या स्पेशल क्लबमध्ये प्रवेश

LIVE: शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा

नागपुरात 3 रस्ते अपघातात 4 जणांचा दुर्देवी मृत्यू

विराट-अनुष्का यांनी वृंदावन जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले

मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घ्यावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Show comments