Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईकरांचा पुन्हा एकदा जिगरबाजपणा

मुंबईची लाईफ-लाईन आणि जनजीवन सुरळीत

Webdunia
मुंबईत दहशतवादी हल्यामुळे खळबळ उडाली असतानाच मुंबईकरांनी पुन्हा एकदा जिगरबाजपणाचे दर्शन घडविले आहे. मुंबईची लाईफ-लाईन असणारी लोकल सेवा सुरूच असून मुंबईकरांच्या नेहमीच्या कामकाजात कोणताही बदल झालेला नाही. ज्याठिकाणी घटना घडली आहे त्या परीसरात तणाव कायम असला तरी इतरत्र जनजीवन सुरळीत आहे.

मुंबईला दहशतवाद नवीन नाही. यापूर्वी अनेकवेळा याठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत पण, याला भिक न घालता मुंबईकरांनी एकमेकांना मदतीचा हात देत दहशतवादाचा धैर्याने मुकाबला केला आहे. बुधवारी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्यामुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. या हल्यामुळे देशभरात भिती आणि चिं‍तेचे वातावरण निर्माण झाले आहे पण, मुंबईकरांनी यावेळी धैर्याने मुकाबला केला आहे.
बुधवारी रात्रभर सुरू असणा-या चककमींच्या बातम्या ऐकताना मुंबईकरांनी रात्र जागून काढली. आज गुरूवार सकाळपर्यंत कमांडोंची कारवाई सुरू आहे आणि तणाव कायम आहे. शाळा व महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्या आहेत आणि ना‍गरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सरकारने केले आहे पण, मुंबईकरांनी या भ्याड दहशतवादी हल्यालाही भिक न घालता आपल्या कामावर परीणाम होऊ दिलेला नाही. या जिगरबाजीला सलाम करत रेल्वेनेही लोकल-सेवा सुरू ठेवली आहे. दक्षिण मुंबईकडे जाणा-या लोकलमध्ये तुलनेने कमी गर्दी असली तरी लोकांमध्ये म्हणावे तसे घबराटीचे वातावरण नाही. आपल्या नातेवाईकांच्या सुरक्षेच्या काळजीने फोन लाईनवचा लोड मात्र वाढला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

Alien city on earth: पृथ्वीवर एलियन्सनी एक शहर वसवले आहे, हे एलियन शहर कुठे आहे?

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

Show comments