Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

SMA Type 1 या दुर्मिळ आजाराशी लढणाऱ्या चिमुकलीला दिलं16 कोटींचं इंजेक्शन !

Webdunia
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (20:59 IST)
मुंबई : SMA Type 1 या दुर्मिळ आजार झाल्याने मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या तीरा कामात नावाच्या या चिमुकलीला आज सकाळी 16 कोटींचं इंजेक्शन देण्यात आलं. आता तिला 24 तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
 
हिंदुजा रुग्णालयाच्या चाईल्ड न्युरोलोजिस्ट डॉ.निलू देसाई म्हणाल्या की, तीराला आज हे इंजेक्शन देण्यात आले असून आता तिची प्रकृती उत्तम आहे. तिला शनिवारी रुग्णालयातून सोडण्यात येईल.
 
तीराला SMA Type 1 हा दुर्मिळ आजार झाला असून तिचा जीव वाचावा यासाठी तिला एक इंजेक्शन दिले गेले. हे इंजेक्शन भारतात मिळत नसून अमेरिकेतून मागविण्यात आले असून त्या इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये आहे. एवढे पैसे नसल्यामुळे या इंजेक्शनासाठी क्राऊड फंडिंगच्या माध्यमाने पैसे उभारण्यात आले. तर सरकारने यावरची इम्पोर्ट ड्युटी आणि जीएसटी माफ केला आहे.
 
लहानपणी तीराला दूध पिताना गुदमरायाचे, श्वास कोंडला जायचा. डॉक्टरांकडे नेले असताना तिच्या पालकांना तिला त्यांनी न्यूरो स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला हा SMA Type 1 हा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले.
 
हा आजार जवळपास सहा ते दहा हजार बाळांमध्ये  एका बाळाला हा आजार होतो आणि तो आजार तीराला झाला. तिचा जीव वाचविण्यासाठी तिला हे इंजेक्शन द्यावे लागणार होते आणि त्यासाठी चा खर्च सुमारे 16 कोटींचा खर्च होणार होता. तीराच्या वडिलांनी सरकारकडे विनंती केल्यावर इंजेक्शन वरील इम्पोर्ट ड्युटी आणि जीएसटी माफीचा निर्णय झाला.आता या इंजेक्शनमुळे तिची प्रकृती सुधारेल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

प्रेयसीची हत्या करून प्रियकराने मृतदेहाचे 50 तुकडे केले

सांगलीतील कृष्णा नदीच्या पुलावरून कार खाली पडल्याने पती-पत्नीसह तिघांचा मृत्यू

LIVE: नाना पटोलेंनी विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाला धारेवर धरले

नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरत विचारले राज्यात सात टक्के मतदान कसे वाढले?

दिल्लीमध्ये प्रशांत विहारमधील PVR सिनेमाजवळ भीषण स्फोट

पुढील लेख
Show comments