Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यातील पेट्रोल पंपावर स्कुटीत 55 हजारांचे पेट्रोल भरले, संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ या

Webdunia
रविवार, 25 सप्टेंबर 2022 (15:03 IST)
पेट्रोलपंपांवर कमी पेट्रोल भरल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात, मात्र महाराष्ट्रातील ठाण्यात हे आश्चर्यकारक झाले आहे. अ‍ॅक्टिव्हा मालकाने पेट्रोल पंपावर 550 रुपयांचे पेट्रोल टाकले, मात्र त्यासाठी 55 हजार रुपये मोजावे लागले. एवढी मोठी रक्कम आपल्या बँक खात्यातून डेबिट करण्याचा मेसेज पाहिल्यावर ही बाब उघडकीस येताच ग्राहकासह पेट्रोल पंपचालकही चक्रावले.एका चुकीमुळे हे सर्व घडले.तसे, ऑनलाइन पेमेंटमध्ये अशा चुका होणे सामान्य झाले आहे.लोकांना कधी नेटवर्कशी तर कधी बँकेच्या सर्व्हरला सामोरे जावे लागते, त्यामुळे काही वेळा पेमेंट अडकते किंवा जास्त होते. नंतर चूक सुधारून ग्राहकांच्या खात्यात शिल्लक रक्कम परत करण्यात आली. 
 
ठाण्यात एक ग्राहक होंडाच्या अ‍ॅक्टिव्हा स्कूटीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचला. त्यांनी 550 रुपये किमतीचे पेट्रोल भरले, मात्र त्यांनी ऑनलाइन पैसे भरले असता त्यांच्या खात्यातून 55 हजार रुपये कपात झाल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी पेट्रोल पंप चालकाकडे तक्रार केली. 
 
अटेंडंटच्या चुकीने पेमेंट केले 
आता बहुतेक पेट्रोल पंपांवर QR कोटद्वारे डिजिटल पेमेंट आहे. येथेही डिजिटल पेमेंटचे प्रकरण समोर आले. वास्तविक, पेट्रोल भरल्यानंतर पेट्रोप पंप अटेंडंटने चुकून 55,000 रुपयांचा QR कोड जनरेट केला. ग्राहकाने त्याचे पैसे भरल्यावर वास्तव समोर आले. जास्त भरलेली रक्कम अ‍ॅक्टिव्हा मालकाला परत करण्यात आली.हा सगळा प्रकार एका चुकीमुळे घडला.

संबंधित माहिती

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

पुढील लेख
Show comments