Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

काळ्या रंगाच्या मांजरीचा मृतदेह सापडला, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

a-case-of-murder-of-a-cat-has-been-registered-at-chitalsar-police-station
, मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (08:52 IST)
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका रहिवाशी इमारतीच्या आवारात काळ्या रंगाच्या मांजरीचा मृतदेह सापडला आहे. या मांजरीची हत्या करण्यात आल्याची तक्रार एका महिलेने पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी चितळसर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध मांजरीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
 
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिलगार्डन सोसायटीच्या आवारात शनिवारी सकाळी एका काळ्या रंगाची मांजर मृत अवस्थेत पडली असल्याचे परिसरात राहणाऱ्या पूजा जोशी दिसून आले. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता पूजा जोशी यांनी आदल्याच दिवशी रात्री मृत मांजरीला जेवण भरवले होते, त्यावेळी हि मांजर व्यवस्थित होती. रात्रीतून अचानक काय झाले म्हणून त्यांनी आजूबाजूला चौकशी केली मात्र याबाबत कुणालाही काही माहित नव्हते. मांजरीची हत्या करण्यात आली असल्याच्या संशयावरून पूजा जोशी यांनी चितळसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाचा, कोरोनाचा धोका सर्वाधिक कोणाला?