Dharma Sangrah

दोन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश

Webdunia
शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (17:41 IST)
ठाणे : भिवंडीत आज (दि. २७) पहाटे दोन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. ही व्यावसायिक इमारत होती. आज पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास भिवंडीमधील खाडीपार भागामध्ये ही घटना घडली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
ग्राउंड प्लस २ म्हणजे तळमजल्यासह वर दोन मजल्याची ही इमारत होती. या इमारतीच्या तळमजल्यात ७ दुकानं होती. वरच्या मजल्यांवर व्यावसायिक आस्थापने होती. इमारत कोसळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले, अशी माहिती निझामपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये माजिद अन्सारी या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. इमारत कोसळली त्यावेळी माजिद हा झोपलेला असल्यामुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर ढिगाऱ्या खाली अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. त्याला कुठलीही दुखापत झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले आहे.
कोसळलेली इमारत ही किती जुनी होती आणि कुठल्या स्थितीमध्ये होती, याची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणी अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

शिंदे यांनी विधान परिषदेचा कार्यभार स्वीकारला आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन तापणार!

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000धावा पूर्ण केल्या

7 डिसेंबर आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन इतिहास आणि महत्त्व

रशियाने युक्रेनवर 653 ड्रोन आणि 51 क्षेपणास्त्रे डागली

हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेतेपदावरून उद्धव यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments