Festival Posters

मुंबई विद्यापीठ : माहिती न पाठवणार्‍या महाविद्यालयांवर कडक कारवाई

Webdunia
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:27 IST)
मुंबई विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण करण्यासाठी महाविद्यालयांकडून माहिती मागवली होती. 823 महाविद्यालयांपैकी काहींनी दिलेल्या मुदतीत माहिती पाठवली आणि काहींनी पाठवली नाही. माहिती न पाठवणार्‍या महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. संलग्न महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण करण्यासाठी शासन स्तरावर समिती नेमण्यात आली होती. महाविद्यालयांच्या सोयीसाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते. सर्व महाविद्यालयांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात आला होता. तरीसुद्धा अनेक महाविद्यालयांनी 15 जानेवारी 2020 या दिलेल्या मुदतीत माहिती पाठवलेली नाही असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. 
 
शैक्षणिक परीक्षण झालेल्या महाविद्यालयांची माहिती सार्वजनिक केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक यांना महाविद्यालयांमधील अभ्यासक्रम, फी, पायाभूत सुविधा यांसह अनेक उपक्रमांची माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार

मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवे रूप आणि आधुनिकीकरण मिळणार, मुख्यमंत्रींनी फोटो शेअर केले

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार, राज्य मंत्रिमंडळाची मोठी मंजुरी, 'हे' असणार नवीन नाव

महिलांच्या खात्यात दरमहा ३,००० रुपये जमा; केवळ ५ रुपयांत जेवण, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

गडचिरोलीमध्ये बोलेरो गाडी उलटल्याने महिलेचा मृत्यू तर पाच मुलांसह १६ जण जखमी

पुढील लेख
Show comments