Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्याने साधे फटाके फोडले नाही, अक्षय शिंदेच्या आईने चकमकीवर प्रश्न उपस्थित केले

Webdunia
मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 (18:57 IST)
बदलापूरच्या बलात्कार प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे क्राईम ब्रांचच्या टीम कडून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जाताना त्याने पोलिसांची बंदूकहिसकावून गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला आणि या चकमकीत अक्षय गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. 

या प्रकरणावरून अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.अक्षयची आई म्हणाली माझा मुलगा असे करूच शकत नाही. साधा रास्ता क्रॉस करताना तो माझा हात धरायचासमोरून येणाऱ्या वाहनांना तो घाबरायचा, त्याने कधी साधे फटाके फोडले नाही तर तो गोळीबार कसे करू शकतो? असा प्रश्न केला आहे. कालच दुपारी आमची भेट तळोजा कारागृहात झाली. आणि संध्याकाळी त्याच्या मृत्यूची बातमी आली. 
 
हे सर्व कटाचा भाग असल्याचा आरोप अक्षयच्या आईने केला आहे. राजकारणाचा बळी माझा मुलगा झाला आहे. 
त्याच्या कुटुंबीयांनी दावा केला की, त्याला बलात्काराच्या प्रकरणात गुन्हा काबुल करण्यासाठी पोलिसांनी दबाब केला होता. त्याला मारहाण केली. मुलाच्या हत्येची चौकशी केलीच पाहिजे. आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. शाळा प्रशासनाच्या दबावातून हे सर्व प्रकरण झाले आहे. तो असं काहीच करू शकत नाही. या गोळीबाराची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी केली आहे. 

अक्षय शिंदे याला तळोजा तुरुंगातून आणत असताना मोरे यांची बंदूक त्याने खेचली आणि गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला या गोळीबारात मोरे यांना गोळी  लागली असून ते जखमी झाले. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला आणि त्याला गोळी लागली. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

पवार कुटुंबात काका-पुतणे एकाच मंचावर, पण एकत्र बसण्यासही नकार

रशियन सैन्यात लढणाऱ्या 12 भारतीयांचा मृत्यू, 16 बेपत्ता

प्रियाच्या कुटुंबीयांनी रिंकूसोबतच्या तिच्या साखरपुड्याच्या बातम्या नाकारल्या आणि सांगितले की सध्या फक्त चर्चा सुरू आहे

डॉक्टरांचा निष्काळजीपणा, रुग्णाच्या मृत्यूने पालघरमध्ये खळबळ,गुन्हा दाखल

LIVE: मुंबईतील ओशिवरा बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बेस्टच्या बसला भीषण आग

पुढील लेख
Show comments