Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रण करण्यासाठी आंतरराज्यासह सर्व यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा - जयंत पाटील

All agencies including inter-state agencies should coordinate for flood control of Gosikhurd project - Jayant Patil maharashtra news mumbai news in marathi webdunia marathi
, सोमवार, 14 जून 2021 (19:31 IST)
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत आंतरराज्ययंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा. त्यामुळे पूरनियंत्रणास मदत होईल, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिले.    गतवर्षी आलेल्या गोसीखुर्द प्रकल्पातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी करण्यात येणाऱ्या पूरनियंत्रण कार्यक्रमाबाबतच्या मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 
 
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, खासदार प्रफुल पटेल, खासदार कृपाल तुमाने, खासदार सुनिल मेंडे उपस्थित होते.           
गतवर्षीसारखी पूरपरिस्थिती यावर्षी निर्माण होऊ नये याकरीता जलसंपदा विभाग तसेच महसूल यंत्रणेने समन्वय साधावा. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर असलेले पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न संबंधित जिल्हाधिकारी यांनी आमदार महोदयांशी चर्चा करुन ते सोडविण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. तसेच या  बैठकीत उपस्थित झालेल्या
 प्रश्नांबाबत २२ जून रोजी मुंबई येथे सविस्तर बैठक घेण्यात  येईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
 
पुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी - मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरण शासन तयार करीत आहे. लवकरच ते पुर्ण होऊन त्याचा लाभ संबंधितांना होईल. गोसीखुर्द प्रकल्पातील असलेले पुनर्वसनाचे प्रश्न पुढील काही काळामध्ये मार्गी काढण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच विभागाने ११६ नवीन मोठ्या बोटी खरेदी करण्याचे ठरविले असून त्याची प्रक्रिया पुर्ण होत आली आहे. त्यातून ४० बोटी विदर्भासाठी देण्यात येणार आहे. आपत्ती काळात प्रशिक्षित टिम तालुकास्तरावर ठेवण्याबाबतची सूचना चांगली असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.  

योग्य समन्वय आवश्यक - सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महत्वाच्या सूचना केल्या. यात प्रामुख्याने मेडीगड प्रकल्प, संजय सरोवर तसेच तेलगंणा राज्याच्या धरणातील पाणी सोडताना व थांबविताना आपल्या राज्याच्या प्रशासनाला विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. ज्यामुळे व्यवस्थित नियोजन करता येईल. गतवर्षीसारख्या अडचणी निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे सांगितले.
 
लोकप्रतिनिधींच्या सूचना
खासदार प्रफुल पटेल यांनी भंडारा शहरासाठी असलेल्या पूरनियंत्रण भिंतीबाबतचे प्रश्न, तेथील पूनर्वसनाचे प्रश्न यात येणाऱ्या अडीअडचणी तातडीने सोडविण्याविषयी सूचना केली. याबाबतचे नियोजन करुन हे प्रश्न सोडविल्यास संभाव्य धोका टळू शकेल असे स्पष्ट केले. खासदार कृपाल तूमाने, खासदार सुनील मेंढे यांनीही मागच्यावेळी झालेले नुकसान पाहता तात्काळ पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागावे, अशा सूचना केल्या.        
आमदार नाना पटोले, ॲड.आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, राजू पारवे, ॲड.अभिजित वंजारी यांनीही संबंधित भागातील पुनर्वसन, नुकसान भरपाई, संभाव्य नियोजन,अडीअडचणी याबाबत महत्वपूर्ण सूचना केल्या.

या बैठकीस जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सचिव (प्रकल्प समन्वयक) तथा कृष्णा खोरे कार्यकारी संचालक टी.एन. मुंडे, कार्यकारी संचालक आर.डी. मोहिते तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत लोकल सेवा सुरु होणार -विजय वडेट्टीवार