Festival Posters

नवी मुंबईवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी पायाभरणी, देवेंद्र फडणवीस आक्रमक

Webdunia
रविवार, 16 फेब्रुवारी 2020 (12:40 IST)
नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा आपली सत्ता येण्यासाठी पायाभरणी करुया, असं म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना बळ दिलं. नवी मुंबईत सुरु असलेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात (BJP Navi Mumbai Adhiveshan) फडणवीस बोलत होते.
 
भाजप हा एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असणारा पक्ष आहे. पक्ष ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. आज सर्व आजी-माजी अध्यक्षांचा सत्कार केला. सामान्य कार्यकर्तांचा निधी घेऊन आपण उत्तम वास्तू तयार करु. नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा आपली सत्ता येण्यासाठी पायाभरणी करुया, असं फडणवीस भाजप कार्यालयाच्या पायाभरणीवेळी म्हणाले.
 
भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे. महाआघाडी सरकार कसं चुकीचं आहे, हे दाखवणारे बॅनर अधिवेशनस्थळी लावण्यात आले आहेत. 
 
विश्वासघात करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असं बॅनरवर लिहिलं असून त्यावर देवेंद्र फडणवीसांचाही फोटो लावण्यात आला आहे.
 
भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनाला पक्षाचे महाराष्ट्रातील खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक सहभागी झाले आहेत. शिवसेना-भाजपला जनमत मिळाल्यानंतरही सेनेने आपली भूमिका बदलली, त्यामुळे भाजपची पुढची भूमिका काय असेल याबाबत या अधिवेशनात विचारमंथन होत आहे.
 
महाविकास आघाडी सरकारने जनतेला 80 दिवसांत कसं मूर्ख बनवलं, यावर प्रस्ताव सादर केला जाईल. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसी आणि सीएए कायद्याबाबत निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या अभिनदंनाचा प्रस्तावही यावेळी सादर करण्यात येईल, अशी माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत (BJP Navi Mumbai Adhiveshan) दिली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: अशोक खरात घोटाळ्यात नाशिकमधील नामवंत डॉक्टर आणि सोनोग्राफी केंद्रे रडारवर

खळबळजनक! सप्तश्रृंगी गडावर मोठी चोरी; देवीच्या मंदिरातून २२ किलो चांदी लंपास!

लाडक्या बहिणींनो घाई करा! ३० एप्रिलपर्यंत e-KYC अपडेट न केल्यास 'लाडकी बहीण' योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता रखडणार

संजय राऊतांचा मोठा दावा, ममता आणि स्टालिन पुन्हा सत्तेत येणार! ; शाहांना दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

सुनेत्रा मुख्यमंत्री झाल्यास मला आनंदच होईल, बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया म्हणाल्या

पुढील लेख
Show comments