Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक

Webdunia
गुरूवार, 22 जुलै 2021 (09:13 IST)
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. पुरेशा लस साठ्याअभावी आज गुरुवारीही मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरेशा प्रमाणात लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणात सातत्याने अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला बुधवारी रात्री उशिरा पर्यंत लससाठा प्राप्त होणार आहे. त्याचं वितरण गुरुवारी  दिवसभरात सर्व शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांना करण्यात येणार आहे.
 
महानगरपालिकेला, कोविशिल्डचे 50 हजार तर कोवॅक्सिनचे 11 हजार 200 असे एकूण 61 हजार 200 डोस प्राप्त होणार आहेत. हा लससाठा उपलब्ध झाल्यानंतर त्याचे उद्या दिवसभरात वितरण केलं जाईल. त्यामुळे  मुंबईत लसीकरण होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.  पण, शुक्रवारी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पक्षाला गृहखाते मिळायला हवे-शिवसेना नेते संजय शिरसाट

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

पुढील लेख
Show comments