rashifal-2026

छोडेंगे नही, पाव तोडेंगे, शिवसेनेची जुन्या मोडमध्ये जाणून दादागिरी सुरूच; नवनीत राणा प्रकरणी चंद्रकांतदादांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Webdunia
मंगळवार, 10 मे 2022 (08:12 IST)
मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना खासदार नवनीत राणा  यांच्या हनुमान चालिसा प्रकरणावर शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
 
चंद्रकांतदादा म्हणाले, लीलावती रुग्णालय (Lilavati hospital) खासगी आहे. तिथे काय करायचे हा रुग्णालय प्रशासन ठरवेल, मात्र शिवसेनेला याचा विसर पडलाय की आपण एक परिपक्व पक्ष आहोत. आपण सत्तेत होतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घ्यावे, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
 
तसेच नवनीत राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचायची होती. तेव्हा शिवसेनेने त्यांना त्यावेळी सांगायचे होते. नवनीत राणांच्या घराबाहेर निदर्शने करण्याची काय गरज होती? ते हनुमान चालिसा म्हणणार होतो, रावणचालिसा नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
 
त्याचसोबत छोडेंगे नही, पाव तोडेंगे असे म्हणत चंद्रकांतदादा यांनी या सर्वांवरून शिवसेना जुन्या मोडमध्ये गेली आहे. दादागिरी सुरू आहे, असा आरोप केला आहे.
 
दरम्यान, नवनीत राणा लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल असताना त्यांचा एमआरआय झाला आहे. त्या कक्षातले फोटो समोर आले असून यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments