Festival Posters

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर महाराष्ट्र द्वेषी : भाई जगताप

Webdunia
मंगळवार, 20 एप्रिल 2021 (09:27 IST)
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. रेमडेसिव्हीरबद्दल फडणवीस आणि दरेकर यांची भूमिका महाराष्ट्र द्वेषी असल्याचा घणाघात भाई जगताप यांनी केला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील महाराष्ट्र द्वेषी आहेत. त्यांनी फायनान्स सेंटर अहमदाबादला नेलं. फडणवीसही आता गुजरात मॉडेलचं अनुकरण करताना महाराष्ट्र कसा मागे राहील हे पाहत आहेत, असा गंभीर आरोप जगताप यांनी केलाय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नाही. मात्र, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी त्यांच्याकडे वेळ आहे, अशी टीकाही जगताप यांनी पंतप्रधान मोदींवर केलीय.
 
फडणवीस हे सत्तेसाठी किती लाचार झाले आहेत. त्यांच्या परवाच्या कृत्यामुळे राज्याचं नाव धुळीस मिळालं. रेमडेसिव्हीरचा साठा केलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी फडणवीस कसे जातात? असा उपरोधिक सवालही भाई जगताप यांनी विचारलाय. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी फडणवीस आणि त्याच्या सहकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीही जगताप यांनी केलीय. लॉकडाऊन उठल्यानंतर फडणवीस आणि भाजपला सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाही. फडणवीसांची १०० पापे भरली आहेत. रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, असा इशाराच भाईंनी यावेळी दिलाय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या जाऊ शकतात

व्हाईट हाऊसजवळ गोळीबारात दोन नॅशनल गार्ड सैनिक ठार, ट्रम्प म्हणाले हल्लेखोराला किंमत मोजावी लागेल

ठाणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी कल्याण-डोंबिवली काँग्रेसला मोठा धक्का, अध्यक्ष पोटे यांचा राजीनामा

मालेगावमध्ये १३ वर्षीय मानसिक रुग्ण मुलीसोबत दुष्कर्म; आरोपीला अटक

२०२९ पर्यंत काँग्रेस "छोटा पक्ष" बनेल; महसूलमंत्री बावनकुळे यांचे कडक शब्दांत वक्तव्य

पुढील लेख
Show comments