मुंबई | मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकवेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले अनिल देशमुखआज सोमवारी ईडी कार्यालयात दाखल झाले. जबाब नोंदवण्यासाठी ते ईडी कार्यालयात दाखल झाले असल्याचे समजते.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या आहेत.