Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरात चार कंपन्या जळून खाक

नवी मुंबईतील एमआयडीसी  परिसरात चार कंपन्या जळून खाक
, शुक्रवार, 6 मे 2022 (18:27 IST)
नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीत अग्नितांडव पाहायला मिळत आहे. सध्या अग्निशमनच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचावाचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आग आटोक्यात आणण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु आहेत.
 
नवी मुंबईतील ही आग प्रचंड मोठी आहे. विशेष म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये ही आग लागली आहे. त्या कंपन्यांमध्ये केमिकलचे ड्रम्स मोठ्या प्रमाणात आहेत. काही कामगार या कंपन्यांमध्ये अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
 
 आतापर्यंत ही आग आठ कंपन्यांमध्ये पसरली आहे. कंपन्यांमध्ये केमिकल ड्रम्स असल्याने आगीचा भडका उडत आहे. या भयानक परिस्थितीला सध्याच्या घडीला नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही आग इतकी भीषण आहे की, अग्निशमन दलाकडून होणा-या पाण्याच्या मा-याचा काहीच फायदा होताना दिसत नाहीये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लाडली लक्ष्मी 2.0 योजना: कॉलेजमध्ये 25 हजार रुपये दोन हप्त्यांमध्ये मिळणार, मुली शिकणार मोफत