Marathi Biodata Maker

मुंबईत यंदा या प्रकारे साजरा होणार गणेशोत्सव

Webdunia
मंगळवार, 5 मे 2020 (11:01 IST)
देशात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबई आणि पुणे येथील परिस्थिती वाईट आहे. लॉकडाऊन सध्या तिसर्‍या टप्प्यात आहे ज्या दरम्यान निर्बंध शिथील केले जात असून जनजीवन पुन्हा सुरळीत करण्याचे प्रत्यन आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही जनजीवन नेहमीप्रमाणे नसेल असं सांगण्यात येत आहे अशात या सर्व परिस्थितींचा परिणाम सण-उत्सवांवर देखील पडणार. 
 
महाराष्ट्रात गणेशोत्सव अत्यंत धूमधडाक्याने साजरा केला जातो परंतू करोनाचा प्रभाव यावरही बघायला मिळणार. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकांचा तसंच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणं योग्य नाही. म्हणून यंदा लोकांना कमी गर्दी करण्याचं आवाहन करण्यात येणार असून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. 
 
लॉकडाउनमुळे अनेक गणेश मूर्तीकारांनाही आपलं काम अद्याप पूर्ण करता आलेलं नाही. यामुळे आता गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करता येईल हा देखील मोठा प्रश्नच आहे. 
 
दुसरीकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीप्रमाणे देखील गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत साजरा होईल मात्र नेहमीप्रमाणे साजरा न होता अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अजित पवार अनंतात विलीन; सर्वांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिला

Weather Update पाऊस आणि मुसळधार बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली, या १० राज्यांसाठी अलर्ट

LIVE: महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार अनंतात विलीन

लिफ्टच्या बहाण्याने चालत्या गाडीत २५ वर्षीय महिलेवर बलात्कार

१५ वर्षांची मुलगी आई झाली, मुलाचे वडील १३ वर्षांचे, या बातमीने कुटुंब हादरून गेले पण...

पुढील लेख
Show comments