Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई मध्ये मुलाला सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेची 10लाखांना फसवणूक

Webdunia
गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (13:01 IST)
मुंबई मध्ये सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. एका आईने आपल्या मुलाला सरकारी नोकरी लागावी म्हणून आपले दागिने विकून दहा लाख रुपये दिले. यानंतर मुलाने एका वर्षभर सफाई कर्मचारी म्हणून नोकरी केली. नंतर समजले की सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने आई मुलाची फसवणूक झाली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार एक महिला आणि मुलाने केलेल्या तक्रारीवरून मुंबईच्या माहीम पोलीस स्टेशनने तीन जणांविरुद्ध फसवणूक प्रकरण नोंदवले आहे. 
 
मुंबई मध्ये राहणारी एक महिला आपल्या मुलाला सरकारी नोकरी लागावी म्हणून 2014 मध्ये आपले दागिने विकले होते. एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून त्या तीन जणांच्या संपर्कात आल्या. मुलाला सरकारी नोकरी लागावी म्हणून या महिलेने तीन जणांना दहा लाख रुपये दिले. त्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, त्यांच्या मुलाला मुंबईच्या बीकेसी मध्ये अल्मेडा चौकाजवळ सफाई कर्मचारी म्हणून नोकरीवर ठेवण्यात येईल. 
 
असे सांगण्यात येते आहे की, या महिलेच्या मुलाने एक वर्षभर तिथे काम केले, एवढेच नाही तर त्याला नकली आयकार्ड देण्यात आले. पण पगार मिळाला नाही. या महिलेने चौकशी केली असता तिला सांगण्यात आले की, तुमची फसवणूक झाली आहे. या महिलेने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सात वर्षानंतर पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तीन जणांना अटक केली आहे व पुढील तपास सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments