राज्य सरकार सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ असी प्रतिक्रिया रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. राज्यात ब्रेक दी चैन अंतर्गत मुंबई लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मुभा नाही आहे. त्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करत जनतेला दिलासा दिला आहे. मात्र अद्यापही मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
राज्य सरकारने आता राज्याने निर्बंध शिथिल केल्याचा आधार घेत केंद्र सरकारला रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली तर आम्हाला काही अडचण नाही. राज्य आपली भूमिका जाहीर करत नाही तोवर केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण शेवटी राज्य कोरोना स्थिती हाताळत आहे, असं म्हणताना दानवे यांनी ज्या क्षणी ठाकरे सरकारनं सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करु असं सांगितलं.