Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धारावीत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध वाटप करण्याचा विचार

धारावीत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध वाटप करण्याचा विचार
, सोमवार, 13 एप्रिल 2020 (11:18 IST)
मुंबईतील सर्वात दाट लोकवस्तीच्या धारावी येथे करोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. अशा भागात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढण्याची भीती आहे. यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकार झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन सल्फेटच्या गोळयांचे वाटप करण्याचा विचार करत आहे. 
 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्ताप्रमाणे धारावीतील करोनाच्या संशयित रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले, त्यांना सर्वप्रथम मलेरीया विरोधी HCQS हे औषध मिळू शकते. उल्लेखनीय आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच HCQS औषधासाठी भारतावर दबाव टाकला होता.
 
धारावीमध्ये आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून तिथे करोना बाधितांची संख्या वाढल्यास स्थिती गंभीर बनू शकते. त्यामुळे महाराष्ट्र सरकार यावर विचार करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अर्थव्यवस्थेला कोरोना शॉक; विकास दर फक्त 2.8 टक्के