Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra ST Workers Protest: ST कामगारांची शरद पवारांच्या घरावर निदर्शने

Webdunia
शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (16:30 IST)
Maharashtra ST Workers Protest: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कामगारांनी अचानक धरणे आंदोलन केले. दरम्यान, एसटी कामगारांनी सिल्व्हर ओकच्या परिसराची तोडफोड करून आंदोलन सुरू केले. एसटी महामंडळाचे पूर्ण विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांच्या गटाने आज गदारोळ केला.
 
आंदोलकांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाच्या परिसरात तोडफोड करून चप्पल फेकल्याचे कळते. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावरच हल्लाबोल केल्याने त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने बुधवारी 22 एप्रिलपर्यंत सर्व एसटी कामगारांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई न करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
 
 
एसटी संपाविरोधातील महामंडळाच्या याचिकेसह अन्य सर्व याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत आज जारी करण्यात आली. न्यायालयाने कामगारांना 22 एप्रिल 2022 पर्यंत कामावर परतण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अखेर संपले. एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला देण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे निर्देशही हायकोर्टाने महामंडळाला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात पुन्हा एसटी धावण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

पुढील लेख
Show comments