Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Makeup Artist Death In Mumbai मेकअप आर्टिस्ट मृतावस्थेत आढळला

Webdunia
बुधवार, 21 जून 2023 (16:05 IST)
मुंबई :  सारा यंथन (वय,26)  असं या युवतीचं नाव  असून ती  चित्रपटसृष्टीतील मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist Death In Mumbai) म्हणून काम करत होती.  तिचा मृतदेह संशयास्पद तिच्या फ्लॅटवर आढळून आला आहे. या प्रकरणी कोणीतरी तिची हत्या करून गळफास लावल्याचा संशयही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. खार पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.
 
 सारा यंथन ही मूळची नागालॅंडची असून ती मुंबईत चित्रपट, टेलिव्हिजन आणि वेबसीरिजमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती. ती खार दांडा  परिसरात एका फ्लॅटमध्ये राहत होती. मंगळवारी रात्री ती फ्लॅटमध्ये हातावर जखमा  व  मृतावस्थेत पंख्याला लटकलेली आढळली.
 
हत्या झाल्याचा कुटुंबियांना संशय
पोलिसांनी नागालँडमध्ये राहणारी मृत साराची आई रोझी यांच्याशी संपर्क साधला. त्या मंगळवारी मुंबईत आल्या. खार पोलिसांनी मंगळवारी दुपारी कूपर हॉस्पिटलमध्ये सारा यंथनचे पोस्टमॉर्टम केले आणि मृतदेह तिच्या आईकडे सोपवला. साराचे एका बँकेत काम करणाऱ्या एका इसमासोबत संबंध होते आणि तो तिला लग्नासाठी बळजबरी करत होता. अशी माहिती तिच्या आईने दिली. पोलिस शवविच्छेदनाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.   
Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नितीन गडकरींना शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान

मुंबईतील व्यावसायिकाची ११.५ लाख रुपयांची फसवणूक, ४ जणांना अटक

२०१६ च्या हत्या प्रकरणात आरोपीला ठाणे जिल्ह्यातील एका न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

ठाणे : अटकेपूर्वी जामिनासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल गुन्हा दाखल

Nagpur violence: हिंसाचारात जखमी झालेल्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू

पुढील लेख
Show comments