आंतरराष्ट्रीय आणि परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा १५ दिवसांचा रिपोर्ट तपासला जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्यात असेलेल्या नियमांचं मुंबई महापालिका पालन करणार आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनचे २ रूग्ण सापड्ल्यामुळे मुंबई महापालिका आता सतर्क झाली आहे. २८ नोव्हेंबरला परदेशातून आलेले प्रवाशी ३ पॉझिटिव्ह आले आहेत. तर ७३ निगेटिव्ह आले आहेत. एकाच वेळी ३७६ जणांचे रिपोर्ट बनवणे खूप कठीण आहे. त्यामुळे हे रिपोर्ट आम्ही पुण्याला पाठविले आहेत. कारण हे रिपोर्ट लवकरात लवकर येऊ शकतात. उद्या किंवा परवा पर्यंत त्यांचा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्या म्हणाल्या की, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक २ हजारांच्या आसपास असते. परराज्यातून मुंबई विमानतळावर येणाऱ्यांचं आरटीपीआर किंवा लसीकरण रिपोर्ट निगेटिव्ह येणं गरजेचं आहे. परंतु मुंबईत एकही ओमिक्रॉनचा रूग्ण सापडलेला नाहीये. परंतु काळजी घेणं गरजेचं आहे. असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
लोक बाधित होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. दुसऱ्या लाटेला रोख लावला त्यानंतर तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवलं. केंद्र , राज्य व महापालिकेने यावर काळजी घेणं गरजेचं आहे. माझी कुटुंब माझे जबाबदारी या दायरेत राहून आपण काम केलं पाहिजे. असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.