rashifal-2026

शरद पवारांना भेटले म्हणून आमदार सतीश चव्हाण अजित पवार गटाकडून निलंबित

Webdunia
शनिवार, 19 ऑक्टोबर 2024 (09:16 IST)
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे आता त्यांच्यावर टीका होत आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाने सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.
  
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले की, आमदार सतीश चव्हाण यांना जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
 
तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्यात खडाजंगी सुरू आहे. अजित पवार यांनी शरद पवारांपासून वेगळे होऊन महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. सध्या महाराष्ट्रात अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाच्या वतीने सतीश चव्हाण यांना पत्राद्वारे निलंबनाची माहिती देण्यात आली आहे. तुम्ही हे कृत्य जाणून बुजून केले असल्याने आणि पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्यामुळे तुम्हाला सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे.
 
महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले आहे. शुक्रवारी रात्री दिल्लीत या तिन्ही नेत्यांची वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार होती त्यात काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दररोज किती अगरबत्ती लावाव्यात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

आपल्या मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्ये कशी शिकवाल?

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात

तुमचे बोलणे प्रभावी करा: संवाद कौशल्यातील (Communication Skills) गुप्त गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

शिवसेना (UBT) ने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली

LIVE: मुंबईत बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा!

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवभोजन थाळी पुन्हा सुरू होणार

मातोश्रीच्या बाहेर उडणाऱ्या एका अज्ञात ड्रोनमुळे खळबळ, सुरक्षा यंत्रणा सतर्क

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण, छत्रपती संभाजी नगरची घटना

पुढील लेख
Show comments