Dharma Sangrah

मराठी भाषा दिनासाठी मनसे आक्रमक, जी कारवाई करायची ती करा खोपकर यांचे आव्हान

Webdunia
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (16:01 IST)
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अर्थात २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता मनसे आक्रमक होत तसा इशाराच मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे. ‘मराठी भाषा दिन पाळण्यासाठी देखील जर सरकार विरोध करणार असेल, तर धन्य आहे हे सरकार. उद्याचा कार्यक्रम होणारच, जी कारवाई करायची ती करा’, असं जाहीर आव्हानच अमेय खोपकर यांनी दिलं आहे. 
 
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने दरवर्षी मनसेकडून कार्यक्रम केले जातात. या वर्षी खुद्द राज ठाकरेंनी जाहीर पत्राद्वारे ‘मराठी स्वाक्षरी मोहिमे’चं आवाहन केलं होतं. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून राज ठाकरेंच्या सहीनिशी हे पत्र पोस्ट करण्यात आलं आह. यामध्ये ‘मराठी राजभाषेच्या निमित्ताने एक सुरुवात केली, तर आपण एक मोठा पल्ला गाठू तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते, ती मराठीत सुरू करूया. त्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील शाखाशाखांत फलक लावलेले असतील, त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि त्याच वेळेला आपली भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा’, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.
 
दरम्यान, शिवाजी पार्क येथे यासाठीचा कार्यक्रम करण्याची परवानगी मनसेकडून मागण्यात आली होती. मात्र, ही परवानगी नाकारण्यात आली आहे. “महापालिकेकडे आम्ही रीतसर परवानगी मागितली होती. सर्व नियम पाळून आम्ही कार्यक्रम करणार होतो. पण आम्हाला परवानगी नाकारली आहे. तरी आम्ही कार्यक्रम पार पाडणार आहोत. सरकारला हवी ती कारवाई माझ्यावर करावी. मी तयार आहे. पण सरकारमधल्या एका मंत्र्याला वेगळा न्याय, आणि नियम काटेकोरपणे पाळणाऱ्याला वेगळा न्याय असं हे चालू आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा दिन पाळायला जर हे सरकार विरोध करणार असेल, तर धन्य आहे हे सरकार”, अशी भूमिका अमेय खोपकर यांनी जाहीर केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

न्यूझीलंडच्या वेस्ट इंडिजवरील विजयामुळे भारताचा WTC टेबलमध्ये स्थान घसरला

मेस्सीच्या भेटीदरम्यान स्टेडियमची तोडफोड, कार्यक्रमाच्या मुख्य आयोजकाला अटक

LIVE: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

महाराष्ट्रात भाजपने वाशीम मध्ये 16 बंडखोर नेत्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली

भारताने स्क्वॅश विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला

पुढील लेख
Show comments