Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई विमानतळाजवळील फनेल झोनमधील इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग होणार प्रशस्त

Webdunia
शनिवार, 4 डिसेंबर 2021 (09:15 IST)
मुंबई विमानतळ धावपट्टीच्या फनेल झोनमुळे बाधित होणाऱ्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग लवकरच प्रशस्त होणार आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी  त्यांच्या पुनर्विकासाचे सर्वंकष धोरण लवकरच राज्याचा नगरविकास विभाग जाहीर करणार आहे.  झालेल्या बैठकीत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे निर्देश दिले असून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई विमानतळाच्या फनेल झोनच्या विकासासंदर्भात  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. 
 
मुंबई विमानतळ धावपट्टीच्या फनेल झोनमुळे पुनर्विकासापासून वंचित राहिलेल्या इमारतींचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे. या इमारतींची उंची वाढवायला तसेच इतर इमारतींप्रमाणे त्यांना एफएसआय आणि टीडीआरचे लाभ घेता येत नसल्याने त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. या इमारतींचा पुनर्विकास करणे व्यावहारिक नसल्याचे कारण पुढे करून अनेक विकासकानी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. मुंबईतील घाटकोपर, कुर्ला, सांताक्रूझ, अंधेरी, विलेपार्ले येथील अंदाजे १५ ते २० लाख लोक या इमारतीमध्ये रहात आहेत. त्यातील अनेक इमारती ६० ते ७० वर्ष जुन्या झाल्याने अत्यंत धोकादायक आणि मोडकळीस आल्या आहेत. त्यात अनेक नागरिक आपला जीव मुठीत धरून जगत आहेत. या इमारतींना दिलासा देण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित करण्याची मागणी होऊ लागली होती. या विषयावर आज पार पडलेल्या बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे मांडल्या. या इमारतींच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित करताना सर्वसामान्य इमारतींना अधिकृत बिल्ट अप एरियाच्या आधारावर टीडीआर द्यावा आणि महापालिकेच्या रेकॉर्डमध्ये आहेत तेव्हढ्याच सदनिका बांधण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली.
 
मुंबई महानगरपालिकेकडून नगरविकास विभागाला याबाबत सविस्तर अहवाल मिळाला असून, या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत दोन ते तीन पर्याय पुढे आले असल्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी सांगितले. यात म्हाडाच्या पुनर्वसन सूत्रानुसार या इमारतींना ३३ (७) च्या नियमाचे फायदे कसे मिळवून देता येऊ शकतील याचाही समावेश असल्याचे स्पष्ट केले. अखेर याबाबतचे सर्वंकष धोरण तयार करून ते लवकरच सादर करू असेही श्री. गगराणी यांनी यावेळी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

एनडीएच्या विजयाबद्दल भाजपच्या विनोद तावडे यांचे पंतप्रधान मोदी आणि महायुतीच्या नेत्यांचे कौतुक

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघात विजय

आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघात विजय, मिलिंद देवरांचा पराभव

Who will be Maharashtra's next CM फडणवीसांनी शिंदेंना तर अमित शहांनी पवारांना फोन केला, काय बोलणे झाले जाणून घ्या

पुढील लेख
Show comments