Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई क्राईम ब्रँची मोठी कारवाई, काश्मीरमधून ड्रग्ज तस्कराला अटक

Webdunia
शनिवार, 15 जानेवारी 2022 (15:34 IST)
मुंबई क्राईम ब्रँचने  काश्मीरमधून गुलजार मकबूल अहमद खान नावाच्या ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. त्यामुळे ड्रग्ज तस्करप्रकरणी आणखी माहिती मिळण्याची शक्यता असून ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
 
काही महिन्यांपूर्वी मुंबई क्राईम ब्रँचने 24 किलो ड्रग्जसह 4 जणांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात गुलजार मकबूल अहमद खान  याचे नाव समोर आले होते. त्यानंतर मुंबई पोलीस अनेक दिवसांपासून त्याला पकडण्याचे नियोजन करत होते. यासाठी मुंबई क्राइम ब्रँचचे 7 जणांचे पथक काश्मीरला गेले आणि गुलजार मकबूल अहमद खान याच्या मुसक्या आवळल्या.
 
काश्मीरमधील सुमारे 100 काश्मिरी पोलिसांनी मुंबई पोलिसांना बॅकअप दिला. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रँचने आरोपीला श्रीनगरमधील शेरगारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मगरमल बाग परिसरातून अटक केली. गुलजार मकबूल अहमद खान हा कोणत्यातरी दहशतवादी संघटनेचा स्लीपर सेल असू शकतो आणि ते नार्को टेररिझमचे प्रकरण असू शकते, असा पोलिसांना संशय आहे. 

संबंधित माहिती

पुण्यात इतक्या वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई

अकोल्यात कलम 144 लागू , कारण जाणून घ्या

दीपा कर्माकरने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पटकावले

Israel Hamas War: हमासने तेल अवीववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला

Malaysia Masters 2024: महिला एकेरीच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या गेममध्ये पीव्ही सिंधूचा पराभव

Doha-Dublin Flight: दोहाहून डब्लिनला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानात बिघाड, 12 जण जखमी

T20 World cup: स्पर्धेसाठी भारतीय संघ न्यूयॉर्कला रवाना,विमानतळावर दिसले रोहित आणि द्रविड

कोलकाता नाईट रायडर्सने 10 वर्षांनंतर जिंकले विजेतेपद

Porsche कार अपघातात नवा खुलासा, ड्रायव्हरला ताब्यात घेऊन पत्नीला धमकावलं

होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे 29 मे पर्यंत पोलीस कोठडीत

पुढील लेख
Show comments