Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई पूर्व सायबर विभागाचा ई-मेल आयडी अज्ञात हॅकरकडून हॅक

Webdunia
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (08:03 IST)
मुंबई पूर्व सायबर विभागाचा ई-मेल आयडी अज्ञात हॅकरकडून हॅक करण्यात आला आहे. हॅकरकडून ‘जे.के. हल्ल्या मागील दहशतवादी मुंबईत ठार’ या आशयाचा ई-मेल मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागातून राज्यभरातील पोलीस ठाण्याच्या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्य सायबर विभागाकडून हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून या मेल सोबत येणारी फाईल उघडू नये, असे आवाहन राज्य सायबर सेलकडून राज्यभरातील पोलिसांना करण्यात आले आहे.
 
मुंबई पोलिसांकडून सायबर गुन्हे विभाग व्यतिरिक्त प्रत्येक प्रादेशिक विभागात सायबर विभाग सुरू करण्यात आला आहे. मुंबई पूर्व, पश्चिम, दक्षिण , उत्तर आणि मध्य असे पाच सायबर विभाग सुरू करण्यात आलेले आहेत. प्रत्येक सायबर विभागात त्या त्या प्रादेशिक विभागातील पोलीस ठाण्यातील सायबरचे गुन्हे दाखल होऊन तपास केला जात आहे. यापैकी पूर्व सायबर विभागाचा ई-मेल आयडी अज्ञात हॅकरकडून हॅक करण्यात आला आहे.
 
या हॅकरकडून पूर्व सायबर विभागाच्या अधिकृत मेल आयडीवरून राज्यातील सर्व पोलीस ठाणे, शासकीय विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांना फिशिंग मेल पाठवण्यात येत आहे. या ई मेल मध्ये इंग्रजीमध्ये terrorist behind jk attack gunned down in mumbai’ (‘जेके हल्ल्या मागील दहशतवादी मुंबईत ठार) या आशयाचा मेल आणि सोबत ‘रिपोर्ट इंटेलिजन्स’ नावाने ‘पीडीएफ’ फाईल पाठवली जात आहे.
 
ही फाईल उघडल्यानंतर संगणकातील डेटा चोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे प्रकरण ‘महाराष्ट्र सायबर विभागाने गंभीरतेने घेतले असून राज्यभरातील पोलीस ठाणे शासकीय विभागाला सतर्क करण्यात आलेले असून या आशयाचा ई-मेल उघडू नये तसेच त्यासोबत असलेली पीडीएफ डाऊनलोड करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी पत्रक पाठवून केले आहे.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments