मुंबईतील वरळी परिसरात रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली, या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत कार ने चिरडून कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मुलगा ही कार चालवत होता. त्याच्या शेजारी दुसरा व्यक्ती बसला होता. जो कार चालक आहे. अपघातानंतर तरुण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
या प्रकरणात कार चालक आणि मुलाचे वडिलांना अटक करण्यात आली आहे.
या बीएमडब्ल्यू कारच्या विम्याची मुदत संपल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अपघाताच्या वेळी गाडीत दोन जण उपस्थित असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका बारच्या मालकाने सांगितले, तरुण काल रात्री 11:48 वाजेच्या सुमारास चौघा मित्रांसह बार मध्ये मर्सडिज कार ने आला आणि रात्री 1:40 च्या सुमारास बिल देऊन ते सर्व निघून गेले. त्यांनी एक एक बियर घेतली असून ते सर्व सामान्य होते. पण हा अपघात बीएमडब्ल्यू ने घडला आहे.
पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला आहे. आरोपी तरुणाचे वय 28 वर्षे आहे. पोलिसांची चार पथके तरुणाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 105, 281, 125 (बी), 238, 324 (4) सह मोटार वाहन कायद्याच्या कलम 184, 134 (बी), 187 नुसार गुन्हा दाखल केला आहे