Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला एमएमआरडीएच्या विविध विकासकामांचा आढावा

Webdunia
बुधवार, 21 एप्रिल 2021 (08:10 IST)
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ.के. एच. गोविंदराज यांच्यासोबत एमएमआरडीएच्या विविध कामांचा आढावा घेतला. मुंबईत, विशेषत: मुंबई उपनगरात एमएमआरडीएमार्फत विविध कामे सुरू आहेत, याबाबत कामाच्या प्रगतीची ऑनलाईन प्रणालीद्वारे चर्चा करण्यात आली.
 
पश्चिम आणि पूर्व द्रूतगती मार्गांवर टप्प्याटप्प्याने सौंदर्यीकरण, वाहतूक व्यवस्थापन, पादचारी आणि सायकलींसाठी मार्ग तयार करणे, फ्लायओव्हरच्या खाली अर्बन स्पेसेस तयार करणे अशी कामे केली जात आहेत. याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पश्चिम द्रूतगती मार्गावर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या भागातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी अंडरपासचे काम लवकरच सुरू होईल. कलानगर फ्लायओव्हर येथील उत्तरेकडील मार्गिकेचे काम लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत होईल, असे पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.
 
मेट्रोच्या कामांच्या प्रगतीबाबतही यावेळी चर्चा झाली. स्टेशनला जोडणाऱ्या मार्गांमध्ये सुधारणा केली जाईल. नरिमन पॉईंट-कफ परेडला जोडणाऱ्या मार्गाबद्दलही यावेळी चर्चा झाली. कोळी बांधवांच्या बोटींना कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही अशाप्रकारे डिझाइन तयार करण्यासाठी कन्सलटंट काम करत आहेत. यावेळी वरळी-शिवडी कनेक्टर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचीही चर्चा झाली. मुंबईतील पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीला आणि कोस्टल रोड ते एमटीएचएलला जोडणारा मार्ग यातून तयार होणार आहे. एमटीएचएलच्या प्रगतीचाही यावेळी पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी आढावा घेतला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

LIVE: मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या,संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याने पती-पत्नीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments