Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू उठवला

No extension
Webdunia
गुरूवार, 7 जानेवारी 2021 (09:08 IST)
मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू उठवण्यात आला आहे. रात्रीच्या कर्फ्यूचा कालावधी वाढवण्यासंदर्भात राज्य सरकारकडून कुठलीही सूचना न आल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईतील रात्रीचा कर्फ्यू न वाढवण्याचा निर्णय  घेतला आहे. या अगोदर रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत नाईट कर्फ्यू होता. या कर्फ्यूची ५ जानेवारीपर्यंत मुदत होती. त्यामुळे आता मुंबईत रात्रीचा कर्फ्यू नसणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 
ख्रिसमस व नववर्ष सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महापालिका क्षेत्रात रात्रीच्या कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. हा कर्फ्यू रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत होता. याची मुदत ५ जानेवारी पर्यंतच होती. ही मुदत संपलेली असल्याने आणि राज्य सरकारकडून कर्फ्यूचा कालावधी वाढवण्याबद्दल कुठलीही सूचना आली नसल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईमधील नाईट कर्फ्यूचा कालावधी न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

पुण्यात एका अभियंत्याने पत्नीवर संशय घेऊन स्वतःच्या मुलाची केली हत्या

LIVE: दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा दावा

अजित पवारांनी मुस्लिमांबाबत केलेल्या विधानावर नारायण राणे यांची प्रतिक्रिया आली समोर

‘उद्धव ठाकरेंनी मला दोनदा फोन केला आणि…’, दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा दावा

शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्काराने नितीन गडकरी सन्मानित

पुढील लेख
Show comments