Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही : फडणवीस

The body of the owner of a car packed with explosives was found outside the house of industrialist Mukesh Ambani Mansukh Hiren informed that he committed suicide by jumping into Kalwa creek Fadnavis has objected. maharashtra news mumbai news marathi news in webdunia marathi
, शुक्रवार, 5 मार्च 2021 (20:41 IST)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्यानंतर विधानसभेत या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली असून देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मी मृतदेहाचे फोटो पाहिले असून हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही असं सांगत त्यांनी शंका उपस्थित केली आहे.
 
“मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात गाडी घरगुती वापरासाठी विकत घेतली असल्याचं म्हटलं आहे. गाडीचं स्टेअरिंग जॅम झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मग क्रॉफर्ड मार्केटला जाऊन ते कोणाला भेटले हा महत्वाचा प्रश्न आहे. घटनास्थळी सर्वात आधी पोहोचणारे सचिन वाझे यांना ओळखत होते का ? इतके योगायोग कसे काय? तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली नाही. मी मृतदेह पाहिलेला असून हात बांधलेले आहेत. हात मागे बांधून आत्महत्या करता येत नाही,” असं सांगत फडणवीसांनी आक्षेप नोंदवला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये १० ते १२ पर्यंत संचारबंदी