Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करणे भोवले; घरातून तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करणे भोवले  घरातून तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज लंपास
Webdunia
बुधवार, 7 डिसेंबर 2022 (15:07 IST)
नाशिक – मित्र मैत्रिणींसमवेत घरात पार्टी करणे एका महिलेस चांगलेच महागात पडले आहे. रात्रभर चाललेल्या पार्टी दरम्यान चोरट्यांनी घरातील ६० हजाराच्या रोकडसह सुमारे साडे पाच लाख रूपये किमतीचे अलंकारांवर डल्ला मारला असून, महिलेने आपल्या मित्र आणि मैत्रिणीवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका पवार (रा.पाईपलाईन रोड,गंगापूररोड), रावसाहेब पगारे (रा.एबीबी सर्कल) व विशाल घन (रा.सावतानगर) अशी महिलेने संशय व्यक्त केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी योगिता यशवंतराव (वय ३०) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार महिला एकमेकांची मित्र मैत्रिणी असून, त्यांनी गुरूवारी (दि.१) रात्री तिडके कॉलनी भागात राहणाऱ्याया तक्रारदार महिलेच्या घरात पार्टीचे आयोजन केले होते. या ठिकाणी शाकाहारी व मांसाहाराची व्यवस्था करण्यात आल्याने पार्टी रात्रीच्या वेळी उत्तरोत्तर रंगत गेली. चौघे मित्र मैत्रिणी पार्टीत गुंग असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या घरातील कपाट उघडून ६० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५ लाख ५६ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आली. मुक्कामी थांबलेली मित्र कंपनी दुसऱ्या दिवशी आपआपल्या घरी परतल्यानंतर ही बाब महिलेच्या निदर्शनास आली. महिलेने तात्काळ आपल्या मित्रांकडे चौकशी केली मात्र संशयितांकडून चोरीचा प्रतिसाद न लाभल्याने तिने पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सूरी करीत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

परभणी : कुलरमध्ये करंट उतरल्याने दोन महिलांचा वेदनादायक मृत्यू

LIVE: भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना सीरियातून धमकीचा फोन आला

बँक सर्व्हर डाउन, UPI पेमेंटमध्ये विलंब होत असल्याने ग्राहक त्रस्त

भरधाव डंपरची कारला धडक, एका जोडप्यासह ३ जणांचा मृत्यू

कोण आहे अण्णा बनसोडे? जे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष झाले

पुढील लेख
Show comments