Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन आरोपींना केली अटक

Webdunia
गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (08:10 IST)
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली असून गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी बुधवारी आणखी तीन आरोपींना पुण्यातून अटक केली. मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, रुपेश राजेंद्र मोहोळ (22), करण राहुल साळवे (19) आणि शिवम अरविंद कोहर (20) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.  
 
या प्रकरणात त्याचा सहभाग सिद्ध झाला असून त्याआधारे त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक करण्यात आली आहे.अटकेनंतर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रुपेश राजेंद्र मोहोळ, करण राहुल साळवे आणि शिवम अरविंद कोहर हे तिघेही पुण्याचे रहिवासी आहे. 
 
तसेच मुंबईतील प्रसिद्ध बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणातील कैथल येथून अटक केली असून  या प्रकरणी पथकाने आरोपी अमित उर्फ ​​नाथी, रहिवासी कलायत बट्टा या गावी अटक केली आहे. या तरुणावर झीशान अख्तरला आश्रय दिल्याचा आरोप आहे. यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या तरुणावर फरार असताना झीशान अख्तरला कर्नालमध्ये भाड्याने घर देऊन आश्रय दिल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार झीशान अख्तरची माहिती गोळा करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने काही दिवसांपूर्वी आरोपीला ताब्यात घेतले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

येथे झाला भगवान राम आणि माता सीता यांचा स्वयंवर, नौलखा मंदिर जनकपूर

Ahoi Ashtami Katha : मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अहोई अष्टमी व्रताची कहाणी नक्की वाचा

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Parenting Tips :मुलामध्ये चांगल्या सवयी वाढवण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

सर्व पहा

नवीन

येवल्यात शिवसेना-ठाकरे गटाला मोठा धक्का, कल्याणराव पाटील यांनी धरला अजित पवारांचा हात

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील 11वा आरोपी कोण?

Mcdonald मॅकडोनाल्ड बर्गर खाल्ल्याने एकाचा मृत्यू, 49 आजारी

चालती स्कूल बस बनली आगीचा गोळा, वेळीच बचावले मुले

वैवाहिक बलात्काराची सुनावणी पुढे ढकलली, CJI चंद्रचूड म्हणाले- मी निकाल देऊ शकणार नाही

पुढील लेख
Show comments