Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डोंबिवली अन् कल्याण पूर्वेच्या काही भागात दोन दिवस वीजपुरवठा राहणार बंद

Webdunia
बुधवार, 20 एप्रिल 2022 (17:07 IST)
डोंबिवली आणि कल्याण पूर्वेतील काही भागांचा वीजपुरवठा बुधवारी व गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. डोंबिवलीतील रामनगर फिडरवरील रामनगर पोलिस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांतीनगर, मद्रासी मंदिर, म्हात्रेनगर, नवीन आयरे रोड, आयरे गाव या भागात आज, बुधवारी वीजपुरवठा बंद असेल. दत्तनगर फिडरवरील स्वामी शाळा, कॉमर्स प्लाझा, टिपटॉप कॉर्नर, जुना आयरे रोड, फाटकवाडी, दत्तनगर, संगीतावाडी, दत्त चौक, शिवमंदिर रोड, डीएनसी कॉलेज, नांदिवली रोड आणि तुकारामनगर फिडरवरील आयरे रोड, तुकारामनगर, सुदामवाडी, आयरेनगर, पाटकर शाळा या भागांत गुरुवारी वीज नसणार आहे.
 
कल्याण पूर्वमधील आजदे फिडरवरील आजदे, पाथर्ली, सागर्ली, एमआयडीसी कॉलनी, आजदेपाडा, जिमखाना रोड, शेलारनाका, इंदिरानगर झोपडपट्टी, रेल्वे कॉलनी, त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी भागात बुधवारी आणि 22 केव्ही टेम्पोनाका फिडर, 22 केव्ही एमआयडीसी फिडर क्रमांक ११वरील एमआयडीसी फेज-2मधील अंशत: काही भागां गुरुवारी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत चा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. देखभाल-दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित भागांतील वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या स्वयंचलित प्रणालीमार्फत संबंधित भागातील वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर 'एसएमएस'द्वारे याबाबत पूर्वकल्पना देण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुपुष्यामृतयोग 2024 : पुष्य नक्षत्रावर सुख-समृद्धीसाठी या गोष्टी अवश्य खरेदी करा

दिवाळीच्या इतिहासाशी निगडित ही माहिती तुमच्यासाठी नवी असू शकते

Diwali Muhurat Trading History दिवाळी मुहूर्त व्यापार कधी सुरू झाला?

Hair Care हे तेल केसांना लावल्याने होतील खूप फायदे

लवकर उठण्याचे हे 5 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ट्रॅव्हिस हेड बीजीटीपूर्वी पाकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानात मालिका खेळणार नाही

मनोज जरांगे आपले उमेदवार या जागेवरून उभारणार!

तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये दीपिकाने 5 वे रौप्य पदक जिंकले, धीरज पराभूत

हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही काँग्रेस चुका करत आहे

Bomb Threat:पुन्हा 30 विमानांना बॉम्बस्फोटाची धमकी, अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments