Marathi Biodata Maker

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ठाणे ते दिवा दरम्यानच्या 2 अतिरिक्त रेल्वे मार्गांचे उद्घाटन

Webdunia
शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (10:24 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या 2 अतिरिक्त रेल्वे मार्गांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदींनी दोन्ही रेल्वे मार्ग ऑनलाइन देशाला समर्पित केले आणि मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पीएम मोदी म्हणाले, 'ठाणे-दिवा दरम्यान नव्याने बांधलेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाच्या लोकार्पणबद्दल प्रत्येक मुंबईकराचे खूप खूप अभिनंदन.

<

Prime Minister Narendra Modi inaugurates newly commissioned rail line between Thane and Diva in Maharashtra pic.twitter.com/OlTQ9sPl1x

— ANI (@ANI) February 18, 2022 >या कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदी पुढे म्हणाले, ही नवीन रेल्वे लाईन मुंबईतील लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल, त्यांच्या राहणीमानात वाढ करेल. या नव्या रेल्वे मार्गामुळे मुंबईच्या कधीही न संपणाऱ्या जनजीवनाला आणखी चालना मिळणार आहे. आजपासून मध्य रेल्वे मार्गावर 36 नवीन लोकल धावणार आहेत, त्यापैकी बहुतांश एसी लोकल आहेत. लोकलच्या सुविधांचा विस्तार, लोकलचे आधुनिकीकरण या केंद्र सरकारच्या बांधिलकीचा हा एक भाग आहे.
 
ते पुढे म्हणाले, स्वतंत्र भारताच्या प्रगतीत मुंबई महानगराचे मोठे योगदान आहे. आता आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी मुंबईची क्षमता अनेक पटींनी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच मुंबईत 21व्या शतकातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आमचे विशेष लक्ष आहे. पीएम मोदी म्हणतात, 'पूर्वी पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालत होते कारण नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत समन्वयाचा अभाव होता.
 
'

संबंधित माहिती

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख वाढवण्यावर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

रेल्वेने 60 दिवसांचा ब्लॉक जाहीर केला

इम्रान खान यांना त्यांची बहीण उज्मा यांनी आदियाला तुरुंगात भेट दिली

चौकीदार वादातून शरद पवार गटाच्या नेत्याला अटक

LIVE: चौकीदार वादातून शरद पवार गटाच्या नेत्याला अटक

पुढील लेख
Show comments