Dharma Sangrah

रेस्टोरंट, मंदिरे पुन्हा सुरु होण्याची शक्यता,मात्र लोकल सेवाचा निर्णय नाही

Webdunia
शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (07:58 IST)
अनलॉकच्या 4 थ्या टप्प्यात रेस्टॉरंट आणि मंदिरे पुन्हा सुरू करावी अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यामूळे लवकरच ही मागणी पुर्ण करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. येत्या ३- ४ दिवसांत याबाबतचा निर्णय होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, असे असले तरी मुंबईकरांना लोकल रेल्वे पुन्हा रुळावर कधी येईल हे पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. लोकल सेवा पुन्हा सुरु करण्याबाबत अजूनतरी काही सकारात्मक बाब समोर येत नाही आहे.
 
दरम्यान राज्यातील मंदिरांसाठी ई-दर्शनाच्या माध्यमातून मर्यादित संख्येने देवदर्शन करता येऊ शकेल, अशी पद्धत सुरु करण्याबाबत टास्क फोर्समध्ये चर्चा झाली आहे. ई-दर्शन किंवा मंदिरात जाण्याची वेळ बूक करता येऊ शकेल, त्यानुसार मंदिरातील गर्दी टाळता येईल.
 
तसेच, रेस्टॉरंटमध्ये पार्सलव्यक्तिरिक्त १० टक्के क्षमतेची बैठक व्यवस्था अर्थात सीटिंग अरेंजमेंटमध्ये रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत विचार आहे. तसेच, शाळा सुरु करण्यासंदर्भातही टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली, मात्र अद्याप कोणताही निर्णय नाही. लोकलप्रमाणेच शाळा सुरु होण्यासही काही काळ वाट बघावी लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

एका खोलीत पाच मृतदेह: एका झटक्यात एक सुखी कुटुंब कसे उद्ध्वस्त झाले?

बिहारचा 'बॉस' कोण बनेल, नितीश कुमार यांचा पक्ष फुटू शकतो का?

LIVE: बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025: ट्रेंड आणि निकालांबद्दल जाणून घ्या

अमरावतीत नवरदेवावर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीला अकोल्यात अटक करण्यात आली; ड्रोनने केला पाठलाग

Bihar Assembly Election Result 2025 LIVE: बिहार विधानसभा निवडणूक निकाल, पक्षाची भूमिका

पुढील लेख
Show comments