Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाचा फोटो ‘व्हायरल’

Webdunia
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (15:06 IST)
मुंबईच्या समुद्रात क्रूझवर अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने मोठी छापेमारी करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. त्यावेळी आर्यन खानसह  अनेक जणांना अटक केलीय. मात्र, त्यानंतर अनेक वेगवेगळे ट्विस्ट आता समोर येतान दिसतात. त्यातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडेयांच्यावर सतत आरोप करत आहेत. तसेच त्यांनी काही फोटोही (Photo) समोर आणले आहेत. यामुळे राज्यात राजकीय वातावरणात अनेक वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर वारंवार आरोप करताना दिसतात. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच नवाब मलिक यांनी ट्विटरवर एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आहे. याला पहचान कौन असा कॅप्शनही दिला आहे. हा फोटो एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांचा असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या पहिल्या लग्नातील हा फोटो असल्याचं देखील सांगितलं जात आहे. पंरतु अजुनही याबाबत काही स्पष्ट माहिती समोर आली नाही. मात्र, नवाब मलिक यांनी क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोचा पूर्ण फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे पहिले लग्न डॉक्टर शबाना कुरेशी हिच्याशी झाल्याचा दावा केला जातोय. तसेच 2006 साली समीर वानखेडे यांचा विवाह शबाना यांच्याशी झाल्याचं म्हटलं जातं आहे.तेव्हाचा पूर्ण फोटो समाज माध्यमांवर प्रसिद्ध होत असून त्यातीलच समीर वानखेडे यांचा फोटो क्रॉप करून नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातुन शेअर केला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

नागपूर रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात टळला,तेलंगणा एक्सप्रेसमधील प्रवासी थोडक्यात बचावले

मालीमध्ये सोन्याची खाण कोसळल्याने 42 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

GG W vs UPW W: गुजरातने UP ला सहा गड़ी राखून पहिला विजय मिळवला

LIVE: आदित्य ठाकरे यांनी रेल्वेमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला

इस्रायली हल्ल्यात हमासचे तीन पोलिस ठार

पुढील लेख
Show comments