Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात संजय राऊतांच्या शिंदे सरकारवर घणाघात, सुप्रिया सुळे यांचा निषेध

Webdunia
बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (13:32 IST)
बदलापुरात शाळेत मुलींच्या लैंगिक शोषणावरून सध्या गदारोळ झाला आहे. या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे.या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी शिंदे सरकारला धारेवर धरत घणाघात टीका केली आहे. त्यांनी या घटनेला घृणास्पद म्हटले आहे.त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलापूरला गेले का नाही असे ही विचारले आहे. 

राष्ट्रवादी शरदचन्द्र पवार गटातील नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेत्तृत्वाखाली राज्य सरकारच्या विरोधात निर्दशने करण्यात आली. त्या म्हणाल्या, राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. विशेषतः महिलाविरोधी गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. 
 
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात आणखी काय होऊ शकते बलात्कार विरोधात जनक्षोभ आहे. जे लोक न्याय मागण्यांसाठी, पीडितेला संरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत, लोकांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी आरोपींवर गुन्हे दाखल करा.ज्या संस्थेत हे घडले आहे ती संस्था कोणाची आहे. लोक पोलिसांकडून मदत मिळत नाही एफआयआर दाखल केली जात नाही म्हणून रस्त्यांवर उतरले आहे. कोलकाता मध्ये जे काही घडले मुख्यमंत्री त्यावर बोलतात. मात्र राज्यात जो काही प्रकार घडला आहे. त्यावर काही बोलत नाही.  
 
राष्ट्रवादी-सपा नेत्या सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेधही केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. मी हे म्हणत नाही. हा सरकारचा डेटा आहे जो शेअर केला जात आहे.पोर्श प्रकरण असो की ड्रग्ज प्रकरण. महाराष्ट्रात महिलांविरोधातील गुन्हे वाढले आहेत. बदलापूरची घटना वेदनादायक आहे.लोकसभेच्या निवडणुकीनंतर सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये द्यायला सुरु  केले. मी काही चॅनल मध्ये पाहिले  आहे महिला सरकारला म्हणत आहे. आम्हाला तुमचे 1500 रुपये नको. सुरक्षा पाहिजे.
Edited by - Priya Dixit   
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख