प्रेयसीशी किरकोळ कारणावरून वाद झाल्यावर 'मला तुझी गरज नाही,तू मरून जा' असं प्रेयसीनं म्हटल्यावर एका तरुणानं चक्क आपले आयुष्य संपविल्याची खळबळजन्य घटना मुंबईत घडली.
अंकुश नामदेव वयवर्षे 27 मूळ राहणार जालना जिल्हा भोकरदन तालुका पिंपळगाव रेणुकाई असे या मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अंकुश चार वर्षा पूर्वी मुंबईला कामाच्या शोधात आला.येथे तो एका खाजगी रुग्णालयात त्याला नोकरी मिळाली. दरम्यान त्याची भेट घटस्फोट झालेल्या एका तरुणीशी झाली.त्यांचे प्रेम प्रकरण सुरु झाले. या नात्या बाबत जेवढा अंकुश प्रामाणिक होता तेवढे ती तरुणी नव्हती.अंकुश ने त्या मुलीशी लग्न करण्यासाठी पैसे देखील जमविले होते.पण ती तरुणी ते पैसे उधळायची अशी माहिती अंकुशला मिळाली.या गोष्टीचा जाब अंकुश ने तरुणीला विचारल्यावर दोघांमध्ये भांडण झाले.त्यावर तरुणीनेअंकुशला 'तू मरून जा मला तुझी काहीच गरज नाही 'असं म्हटल्यावर ही गोष्ट अंकुशच्या मनाला लागून गेली आणि काहीच मिनिटातच त्याने फेसबुकवर लाईव्ह करत आत्महत्या केली.प्रेयसीने आमच्या मुलाचा मानसिक छळ केल्यामुळे त्याने असं केले असे आरोप नातेवाईकांनी लावले आहे.या बाबत अद्याप कोणतीही कारवाई केल्याची माहिती मिळाली नाही.