सध्या स्वाईनफ्लूच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसात स्वाईनफ्लूचे 52 नवीन रुग्ण आढळले आहेत. ठाण्यात रुग्णांची संख्या 402 झाली आहे. स्वाईनफ्लूच्या रुग्णात होणाऱ्या वाढीमुळे आता चिंतेत भर पडली आहे. स्वाईनफ्लूमुळे आता पर्यंत 14 रुग्ण दगावले आहेत.
आता सणासुदीचे दिवस आहे काहीच दिवसांवर गणेशोत्सव येणार आहे. सणामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या आजाराशी लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सण, उत्सवाच्या काळात आजार वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे या आजारासाठी अधिक सज्ज व्हावे लागणार आहे.
ठाणे जिल्ह्यात सध्या 402 स्वाईनफ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. 170 रुग्ण उपचाराधीन आहे. नवी मुंबईत 33 , मीरा-भाईंदर येथे 6 ठाणे ग्रामीण भागात 4 बदलापूर मध्ये 8 तर अंबरनाथ येथे स्वाईनफ्लूचा 1 रुग्ण आढळला आहे. केडीएमसीत रुग्णाची संख्या 56 झाली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.