Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 30 March 2025
webdunia

टीम इंडियाचे दिल्ली नंतर मुंबई मध्ये जल्लोषात स्वागत...वल्ड चॅंपियन मानले आभार

Marine Drive
, शुक्रवार, 5 जुलै 2024 (10:02 IST)
घवघवीत यशानंतर टीम इंडिया मायदेशी परतली. 13 वर्षांनंतर भारताने क्रिकेटचा विश्वकप जिंकला आहे. हे कारण आहे की टीम इंडियाचे दिल्लीने तर स्वागत केले तसेच मुंबई ने देखील जल्लोषात स्वागत केले. सर्व खेळाडूंनी चाहत्यांचे आभार मानले.
 
वानखेडे मध्ये खास आयोजनानंतर टीमला 125 करोड रुपयांचा चेक सोपविण्यात आला. कमीतकमी 16 तास प्रवास केल्यानंतर टीम इंडिया दिल्लीला पोहचली. विमानतळावर झालेल्या भव्य स्वागत नंतर सर्वांचा थकवा दूर पळाला. 
 
यानंतर सर्व खेळाडू पंतप्रधान निवास्थानी गेलेत. त्यानंतर मुंबईसाठी रवाना झालेत. टीम इंडियाचे मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत झाले. विमानतळावर भारतीय क्रिकेट टीम ला वाटर सॅल्यूट देण्यात आला. चारही बाजूंनीं इंडिया इंडिया घोषणा दिल्या गेल्या. मरीन ड्राइव्ह पासून तर वानखेडे स्टेडियम पर्यंत लाखो लोक खेळाडूंना भेटण्यासाठी एकत्रित झाले होते. वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने सर्वांचे आभार मानले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Weather News : पुढील पाच दिवस अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट