Marathi Biodata Maker

राणा दाम्पत्यानं बाहेर पडून दाखवावंच, शिवसैनिकांच आव्हान

Webdunia
शनिवार, 23 एप्रिल 2022 (09:44 IST)
राणा दाम्पत्याच्या मुंबईतल्या खार निवासस्थानी शिवसैनिकांचा खडा पहारा दिला आहे. हिंमत असेल तर राणा दाम्पत्यानं बाहेर पडून दाखवावंच , असे खुलं आव्हान शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला दिले आहे. भाजपच्या सांगण्यावरुन स्टंट करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेने केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार फिल्डिंग लावली. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतील खारच्या घराबाहेर शिवसैनिकांनी रात्रभर खडा पहारा दिला. राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू न देण्याची व्यूहरचना शिवसैनिकांनी आखली. त्यामुळे काल संध्याकाळपासूनच शिवसैनिक तिथं जमले आणि त्यांनी भजन-कीर्तन सुरू केलं. इमारतीबाहेर बॅरिकेटिंग करण्यात आलं. त्याच्या बाहेरच्या बाजूला शिवसैनिक जमलेत.
 
 राणा दाम्पत्य मातोश्रीवर आज धडक देणार असल्यामुळे शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर रात्रभर पहारा देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी वर्षावर जाण्यापूर्वी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला शिवसैनिकांना घरी जाण्याचं आवाहन केलं. मात्र शिवसैनिकांनी घरी जाण्यास नकार दिला. मुख्यमंत्री आणि  त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राणांच्या इशारामुळे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक घेऊन शिवसेना नेत्यांशी चर्चा केली.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा लाच घेताना व्हिडिओ प्रसिद्ध केला

सरकारने इंडिगोविरुद्ध कडक कारवाई केली; एअरलाइनने 10 टक्के उड्डाणे कमी केली

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदार यादीच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाहीर

UIDAI चा मोठा निर्णय, आधार फोटोकॉपी बंद होणार; नवीन नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments