Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तीन दिवसांमध्ये मुंबईचं तापमान सात अंशांचा फरक

तीन दिवसांमध्ये मुंबईचं तापमान सात अंशांचा फरक
, सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (16:04 IST)
मुंबईसह कोकणाकडे पावसाने पाठ फिरवल्याने शहराच्या तापमानामध्ये कमालीची वाढ झालीय. भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तोंड फिरवल्याने मुंबईचं तापमान ऑगस्टमध्येच वाढताना दिसत आहे.मागील तीन दिवसांमध्ये मुंबईचं तापमान सात अंशांचा फरक पडल्याचं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.
 
होसाळीकर यांनी ट्विटरवरुन एक आलेख पोस्ट केलाय. यामध्ये त्यांनी मागील तीन दिवसांमध्ये सांताक्रुझ येथील हवामानखात्याच्या वेधशाळेत मुंबईतील तापमान वाढल्याची नोंद करण्यात आल्याचं म्हटलं आहे.आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईतील तापमान ३३ अंशांवर पोहचल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील तापमान हे २६ अंशांपर्यंत होतं.मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने निरभ्र आकाश दिसून येत असून तापमानातही वाढ झाल्याचं होसाळीकर म्हणालेत. 
 
ऑगस्टच्या प्रारंभापासूनच मुंबई शहर,उपनगर,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली.कडक ऊन आणि अधूनमधून येणारी एखादी हलकी सर अशा वातावरणामुळे तापमानही वाढले आहे. मुंबई उपनगरात काही दिवसांपूर्वी २६.५ अंश सेल्सिअस किमान, तर ३१.८अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.दोन्हींमध्ये सरासरीच्या तुलनेत २अंशांची वाढ दिसून आली.मुंबई शहर भागात आणि रत्नागिरी येथेही कमाल तापमानात २ अंशांची वाढ काही दिवसांपूर्वीच झाली असून आता ही वाढ अधिक असल्याचं स्पष्ट होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुलढाण्यात भीषण अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू,18 प्रवासी जखमी