Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महायुती अडचणीत? 'Vote Jihad' या शब्दाची होणार चौकशी, निवडणूक आयोगाचा इशारा

Webdunia
गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (11:01 IST)
मंगळवारी विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याची घोषणा झाल्यानंतर निर्णय घेण्यात येत आहे. दरम्यान घोषित केल्या गेलेल्या 200 पेक्षा अधिक सरकारी निर्णयांमधून अनेक आचार संहिता लागू झाल्यानंतर जरी करण्यात आले आहे.महाराष्ट्र निवडणूक आयोगाने याला गंभीरपणे घेतले आहे. तसेच याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे आयोगाने बुधवारी जाहीर केले. त्याचवेळी महायुतीने वापरलेल्या 'वोट जिहाद' या शब्दाचीही आयोग चौकशी करणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय निवडणूक आयोग ने मंगळवारी विधानसभा निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यानंतर बुधवारी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी मुंबई माहिती दिली की,यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबतही सविस्तर माहिती देखील देण्यात आली. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य सरकारकडून दिवसभर शासन निर्णय जारी करण्यात आले. तसेच आयोगाने म्हटले आहे की यात आमदारांना निधी वाटप आणि इतर अनेक प्रशासकीय मान्यतेशी संबंधित अध्यादेशांचा सहभाग आहे. त्यामुळे दुपारी 3.30 नंतर जे काही शासन निर्णय जाहीर केले जातात, ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे का, याची तपासणी केली जाईल.
 
तसेच 'वोट जिहाद' सारख्या जातीय शब्दांच्या वापरावर चोकलिंगम म्हणाले की मंगळवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जर काही नेत्यांनी ते वापरले तर आम्ही कोणालाही सोडणार नाही. आमच्याकडे कोणतीही तक्रार आल्यास आम्ही कायदेशीर यंत्रणेमध्ये त्याची चौकशी करू आणि त्यानुसार आमचा अहवाल सादर करू असे देखील ते म्हणाले.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Valmiki Jayanti 2024: कोण होते महर्षी वाल्मिकी, सम्पूर्ण माहिती जाणून घ्या

काँग्रेस खासदार आणि जेडीयूच्या आमदाराला जीवे मारण्याच्या धमक्या

पीएम मोदी बनले भाजपचे पहिले सक्रिय सदस्य, पंतप्रधानांनी ही सदस्यत्व मोहिमेला केली सुरुवात

दीड लाख लोक बेघर होणार, धारावी विकास प्रकल्पातून अदानीला 50 हजार कोटींचा नफा, सरकार आल्यावर रद्द करू : ठाकरे

आगामी काळात लाडकी बहीण योजनेची रक्कम आणखी वाढवण्यात येणार : अजित दादा

पुढील लेख
Show comments