Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत खार मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग, आरोपीला अटक

arrest
Webdunia
बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (18:09 IST)
बदलापूरचे चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना खार मध्ये दोन अल्पवयीन मुलींचे विनयभंग करण्याची घटना घडली आहे.खारच्या दांडा परिसरात दोन सख्ख्या अल्पवयीन मुलींचे विनयभंग करणाऱ्या शेजाऱ्याला अटक केली आहे.आरोपी मुलींच्या शेजारी राहतो आणि स्वयंपाक बनवण्याचे काम करतो. दोन घर सोडून आरोपी राहतो. मुलींच्या घरी त्यांची आजी होती. मुलींचे वय 6 वर्ष आणि 12 वर्ष असे आहे.

आरोपीने मंगळवारी सहा वर्षाच्या चिमुकलीला जीभ दाखवून घरात बळजबरी शिरला आणि मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. घरात मुलीच्या आजीने आरडाओरडा केल्यावर आरोपीने त्यांना धमकावले .मुलीने सर्व माहिती आपल्या पालकांना फोन वरून दिली.  

मुलींचे पालक कामावरून आल्यावर मुलीने घडलेले सांगितले. त्यावेळी आरोपी ने मागील शनिवारी खिडकीतून डोकावून इशारे केल्याचे सांगितले. मुलींच्या आई वडिलांनी तातडीनं खार पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपीची तक्रार केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो  अंतर्गत आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत २२ नक्षलवादी ठार तर एक जवान शहीद

LIVE: दिशा सालियान प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणाले ‘मला बदनाम करण्याचा प्रयत्न’

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले

बंद खोलीत 87 किलो सोन्याचे बार सापडले

पुढील लेख
Show comments