Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमिताभच्या घरावर हल्ला

रिकाम्या बाटल्या फेकल्या

Webdunia
IFMIFM
बॉलीवुडचा सुपरस्टार अमिताभ यांच्या प्रतीक्षा या बंगल्यावर रविवारी रात्री राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी बाटल्या फेकल्या. त्यामुळे मुंबईत पेटलेल्या मराठीविरुद्ध उत्तरभारतीय या वादाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून श्री ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात विधाने करून आघाडी उघडली आहे. उत्तर भारतीयांच्या छटपूजेवरही त्यांनी टीका केली आहे. याचे पडसाद सर्वत्र उमटले असून सर्वच राजकीय पक्षांनी त्याचा निषेध केला आहे.

ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबईतील उत्तरप्रदेशी टॅक्सीवाल्यांविरूद्धात आंदोलन छेडले होते. यात काही टॅक्सीवाल्यांना मारहाण करण्यात आली होती, तसेच ठाणे येथील एका भोजपुरी चित्रपटाची पोस्टर्स फाडण्यात आली आणि हा चित्रपट बंद पाडण्यात आला. नाशिकमध्येही अशाच प्रकारचे आंदोलन झाले. यानंतर रात्री उशीरा कार्यकर्त्यांनी श्री बच्चन यांच्या प्रतीक्षा या बंगल्यावर बाटल्या फेकल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पोलिसांनी मात्र, अशी घटना घडलीच नसल्याचे म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक दीपक काटदरे म्हणाले, की श्री. बच्चन यांच्या बंगल्यासमोर खासगी सुरक्षा रक्षकांव्यतिरिक्त आम्ही आमचेही पोलिस कर्मचारी तेथे तैनात केले आहेत. त्यांनी रात्री अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे सांगितले.

पण तेथे असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने सांगितले, की रात्री दीडच्या सुमारास शिवीगाळ करणारे काही लोक बंगल्याच्या दिशेने बाटल्या फेकून जाताना आम्ही पाहिले.

तत्पूर्वी, रात्री समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंग यांनी ठाकरे यांच्याविरूद्ध आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याचे त्यात म्हटले आहे.

कालच्या हिंसाचारात भोजपुरी चित्रपट दाखविणारी मुंबईतील दोन चित्रपटगृहांवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला. शिवाय पाच गाड्यांचे नुकसानही केले. कालच्या हाणामारीच्या प्रकरणात मनसेच्या पंधरा व सपाच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान मुंबई देशातील सर्व नागरिकाची आहे, तेथे येणार्‍या सर्वाचे रक्षण ही आमची जबाबदारी आहे, ती आम्ही योग्य प्रकारे निभावू असे उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी सांगितले.

या दरम्यान मुंबईत उत्तरप्रदेशी लोकांना होत असलेला विरोध हा त्यांच्या निष्ठा आपल्या मातृभूमीबद्दल असल्यामुळे आहे. या लोकांनी मुंबईत राहताना मराठीत बोलावे, मराठी संस्कृती आपलीशी केली तर आमचा त्यांना विरोध राहणार नाही असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नागेश सारस्वत यांनी म्हटले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात या घरगुती लिप बामने तुमचे ओठ मऊ आणि सुंदर ठेवा

जायफळाची ही आयुर्वेदिक रेसिपी अनिद्रासाठी परिपूर्ण आहे

पांडा पेरेंटिंग म्हणजे काय, मुलांना वाढवण्यासाठी ते सर्वोत्तम का मानले जाते?

घरातील झाडू जास्त काळ टिकवण्यासाठी या ट्रिक नक्की अवलंबवा

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

Show comments