Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी आंदोलनाचा पहिला बळीही मराठीच!

अभिनय कुलकर्णी
शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:02 IST)
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राबल्य असलेल्या नाशिकमध्ये त्यांच्या अटकेचे तीव्र पडसाद उमटले असून अटकेचे वृत्त कळताच काही मिनिटांमध्ये नाशिकमध्ये हिंसाचारास सुरूवात झाली आहे.

अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या असून नाशिकमधील क. का. वाघ महाविद्यालयासमोर झालेल्या दगडफेकीमध्ये एच. एल. मध्ये काम करणारे अंबादास धारराव यांना आपला प्राण गमवावा लागला. राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा पहिला बळी देखील मराठी माणूसच ठरला आहे.

नाशिकमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक झाल्याने अघोषित कर्फ्यूची स्थिती निर्माण झाली असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय राज्यमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहे. नाशिकमधील उद्रेकाचा तेथे राहणार्‍या उत्तर भारतीयांनी प्रचंड धसका घेतला असून नाशिकबाहेर जाणार्‍या रेल्वे आणि बसेस भरभरून वाहत आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi

Gen-Beta Baby Girl Name: जानेवारी 2025 मध्ये जन्म घेणार्‍या मुलींसाठी यूनिक नाव

Gen-Beta Baby Name: जानेवारी 2025 मध्ये जन्म घेणार्‍या मुलांसाठी यूनिक नाव

डिनर विशेष रेसिपी पालक कीमा

Show comments