Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अरविंद केजरीवाल यांनी खर्चाचा हिशेब द्यावा- कोर्ट

वेबदुनिया
WD
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशेब देण्याचे आदेश हायकोर्टाने मंगळवारी दिले. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील केजरीवाल यांच्या खर्चाबाबत कोर्टात एक याचिका दाखल करण्‍यात आली आहे. केजरीवाल यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे याचिकेत म्हटले आहे. भाजप नेत विजेंद्र गुप्ता आणि आरती मेहरा यांनी ही याचिका दाखल केली आहे.

याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केजरीवाल यांनी पुढील दोन आठवड्यात निवडणुकीतील खर्चाचा हिशेब कोर्टासमोर सादर करण्‍याचा आदेश देण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सात मार्च रोजी होणार आहे. केजरीवाल यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

Show comments