Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करा.

वेबदुनिया
WD WD
नैसर्गिक संकटे आणि आपत्तीत मानवतेची ज्योत मात्र नेहमीच प्रज्वलित राहिल्याचे दिसून आले आहे. भूकंपात उध्वस्त झालेल्या, सुनामी लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या आणि प्रचंड पुरांच्या वेढ्यात अडकलेल्यांपर्यंत मानवी मदतीचा हात पोहोचला होता, तो याचमुळे. ‘मोडून पडला तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हण ा ’ एवढीच या सार्‍या संकटग्रस्तांची अपेक्षा असते. आताही तीच वेळ आली आहे.


बिहारमध्ये कोसी नदीने कहर केला असून गावेच्या गावे उध्वस्त केली आहेत. उफाणलेल्या या नदीने लाखो लोकांना विस्थापित केलं आहे. घरातलं होतं नव्हतं सगळं वाहून गेलंय, जनावरही गेलीत, घरात खायला दाणाही नाही आणि डोक्यावरचं छप्परही गेलंय. अनेकांचा आधारही पुराने ओढून नेलाय. अशावेळी त्यांना आपल्या आधाराची गरज आहे.

पुराने सगळंच नेल्यामुळे या पुरग्रस्तांकडे काहीही उरलेलं नाही. त्यांची कच्चीबच्चीही भुकेजलेली आहेत. पण पोट भरेल एवढं अन्नही त्यांना मिळत नाही. म्हणूनच त्यांना मदत करण्यासाठी आता आपण पुढे होऊया. त्यांचं दुःख वाटून घेऊया. त्यांना आधार देऊया. सध्या गणेशोत्सव सुरू आहेच. त्या विघ्नहर्त्याने बिहारच्या पूरग्रस्तांवरील संकट दूर करावे अशी प्रार्थना आपण करूया.

त्याचवेळी आपण या पूरग्रस्तांना ‘नई दुनिया पूरग्रस्तांसाठीच्या मदत निध ी ’त सढळ हाताने आर्थिक मदत मदतही देऊ शकता. वेबदुनियासुद्धा नई दुनिया ग्रुपचाच एक भाग आहे. त्यामुळे मदत देण्यात काहीही अडचण येणार नाही. आपण दिलेली मदत आयकराच्या ८० (जी) या कलमाखाली सवलतीस पात्र असेल.

नई दुनिया व्यवस्थापन व कर्मचार्‍यांनी या ‘रिलीफ फंडासाठ ी ’ पाच लाख रूपयांची मदत दिली आहे. तुम्हीही आपल्या समाजिक जबाबदारीचे भान राखून मदतीसाठी पुढे याल ही अपेक्षा आहे.

आपण आपले धनादेश खालील नावाने

Naidunia Baadh Rahat Kosh.
या पत्त्यावर पाठवू शकता.
नईदुनिय
60 /1 लाभचंद छजलानी मार्ग- इंदौर (मध्य प्रदेश)

यासंदर्भात काही शंका असल्यास कृपया customer.care@webdunia.net या मेल पत्त्यावर संपर्क साधा.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments