Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आसाराम बापूंच्या सेवकाचा मृत्यू की हत्या?

Webdunia
मंगळवार, 29 जुलै 2014 (17:05 IST)
छिंदवाडा- मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आसाराम आश्रमात आणखी एका सेवकाचा संशयित मृत्यू झाला आहे. पतीराम डेह‍रिया असे या सेवकाचे नाव आहे. पतीराम डेहिरया याचा मृत्यू झाला की हत्या? अशी साशंकता व्यक्त केली जात आहे.

आश्रमातील अल्पवयीत मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तुरुंगात कैद असलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक संत आसाराम बापू यांच्या सेवकाचा मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. याप्रकरणामुळे आसाराम बापू पुन्हा एकदा संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे. आसाराम बापूंच्या एका साक्षीदाराची यापूर्वी हत्या झाली होती. त्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छिंदवाडा येथील आसाराम आश्रमात पतिराम डेहरिया अनेक वर्षांपासून कार्यरत होता. रविवारी रात्री उशीरापर्यंत त्याने जप केला. नंतर पतीराम आल्या खोलीत जाताना शिडीवर त्याला सापाने दंश केला. पतीरामला सापाने दंश केल्यानंतर आश्रमात खळबळ उडाली. पतीरामला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, उपचार सुरु असताना पतीराम याची प्राणज्योत मालवली. पोलिस आश्रमातील अन्य सदस्यांची कसून चौकशी करत आहेत.

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

Show comments